breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,86,321 वर

  • मुंबईत 1,791, पुण्यात 946 नवे रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. शनिवारी आढळलेल्या 10 हजार 259 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 15 लाख 86 हजार 321 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 250 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 41 हजार 965 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 14 हजार 238 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 13 लाख 58 हजार 606 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 1 लाख 85 हजार 270 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत शनिवारी कोरोनाचे 1 हजार 791 नवे रुग्ण आढळले, तर 47 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 40 हजार 339 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9 हजार 682 इतका झाला आहे. तसेच मुंबईत आतापर्यंत 2 लाख 08 हजार 099 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 18 हजार 717 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात काही दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 946 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 42 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 13 हजार 645 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 7 हजार 418 इतका झाला आहे. तसेच काल जिल्ह्यात 860 इतक्या रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. दरम्यान, शनिवारी आढळलेल्या 946 नव्या रुग्णांपैकी 418 रुग्ण पुणे शहरातील असून 209 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 1 लाख 57 हजार 051 वर पोहोचली आहे, तर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या 85 हजार 323 इतकी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button