breaking-newsपिंपरी / चिंचवड

घरात विश्रांती घेणा-या ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्यांवर चोरट्याचा डल्ला

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

‘एलआयसी’चे पैसे भरण्याचे कारण सांगून घरात आलेल्या व्यक्तीने घरामध्ये झोपी गेलेल्या ज्येष्ठ महिलेच्या हातातील 1 लाख 30 हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या पसार केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 2) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पिंपरीतील हेमुकलाणी गार्डनजवळ घडला.

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. रंजना सुरेश उत्तेकर (वय 40, रा. इंद्रायणी हाऊसिंग सोसायटी, नंबर 2, गणेश अटो गॅरेजजवळ, रुपीनगर, निगडी) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना उत्तेकर या घरकाम करतात. त्यावेळी ‘एलआयसी’चे पैसे भरायचे आहेत, असे सांगून एक अनोळखी व्यक्तीने घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील ज्येष्ठ महिला झोपलेल्या होत्या. त्याचा गैरफायदा घेऊन त्यांच्या हातातील 1 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या काढून घेऊन लंपास केल्या. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button