breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

घरकुलच्या प्रश्नांवरती राजकारण नको; सर्वांना सरसकट घरकुल द्या

घरकुल लाभार्थी नागरिकांची मागणी

पिंपरी | प्रतिनिधी

पंतप्रधान आवास योजनेमध्ये घर मिळावे यासाठी पात्र लाभार्थी म्हणून ज्यांनी फॉर्म भरले अशांची संख्या 47 हजार 801 एवढी आहे. यापूर्वी जवाहरलाल नेहरू पंतप्रधान आवास योजने मध्ये ‘वेटिंग’ वरील पात्र लाभार्थी 6 हजार 720 एवढे आहेत. या सर्वांना घरकुल मिळावे, अशी मागणी या योजनेतील अर्ज भरलेल्या लाभार्थ्यांनी केली आहे. घरकुलच्या प्रश्नांवरती राजकारण न करता ज्यांनी ज्यांनी या योजनेमध्ये फॉर्म भरले त्या सर्वांना घरकुल मिळावेत, अशी मागणी देखील या लाभार्थ्यांनी केली आहे.

रामकृष्ण मोरे सभागृह येथे घरकुल धारकांचा लकी ड्री काढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी याठिकाणी एकत्र आले होते. या वेळी घरकुल लाभार्थ्यांनी वरील प्रमाणे आपल्या भावना व्यक्त केल्या. आम्ही कर्ज काढून सोनं गहाण ठेवून गळ्यातील मणी मंगळसूत्र घाण ठेवून घरकुल साठी पाच हजार रुपये भरले आहेत आता फक्त लकी ड्रॉ द्वारे तीन हजार 664 लोकांना घरकुल दिले जाणार आहे मग उर्वरित लाभार्थ्यांनी काय करायचे असा प्रश्न यावेळी लाभार्थ्यांनी उपस्थित केला आम्हाला जर घर द्यायचे नव्हते तर मग आमचे पाच हजार रुपये का भरून घेतले असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला. घरकुल लाभार्थ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत अन्यथा कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button