भाजप खासदार हिना गावित आणि विजयकुमार गावित कोरोना संक्रमित
भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित आणि आमदार डॉ. विजयकुमार गावित यांना कोरोनाची लागण झाली आहे. हिना गावित यांनीच याबद्दल माहिती दिली आहे.
खासदार हिना गावित यांनी फेसबुक पोस्ट शेअर करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. ‘आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने मी होम क्वारंटाइन झालेली आहे. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व स्वतःची काळजी घ्यावी, असं आवाहन हिना गावित यांनी केले.
तसंच, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती बरी आहे लवकरच आपल्या सेवेसाठी उपलब्ध राहिल’ असंही गावित यांनी सांगितले.
हिना गावित यांचे वडिल आणि माजी मंत्री विजयकुमार गावित यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचीही कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आपल्या संपर्कामध्ये आलेल्या सर्वांना चाचणी करून घेण्याचे आवाहन गावित कुटुंबाने केले आहे.