ताज्या घडामोडीराष्ट्रिय

एलआयसीचा अर्ज सेबीकडे पाठवला; मार्च अखेरपर्यंत IPO येणार?

देशातील सर्वात मोठा IPO येण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने अखेर LIC चा IPO आणण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी केंद्र सरकाने सिक्युरिटीज एंड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीकडे IPO साठी अर्ज केला आहे. सरकार LIC चा पाच टक्के भाग विकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, LIC गुंतवणूकदरांसाठी १० टक्के भागीदारी राखीव ठेवण्यात येणार आहे. या IPO मधून ३१.६२ कोटींची विक्री करण्यात येणार आहे.

सरकार एलआयसीतील 5 टक्के समभाग म्हणजेच शेअर विकणार आहेत. आणि यातून 65 ते 75 हजार कोटी उभारण्याचा मानस सरकारचा आहे. आतापर्यंत सर्वाधित मोठा आयपीओ हा नुकतीच लिस्टिंग झालेली पेटीएम कंपनी आहे. पेटीएम कंपनीचा आयपीओ हा 18 हजार 500 कोटी रुपयांचा होता.

एलआयसी सर्वसामान्य गुंतवणुकदारांसाठी योजनेच्या 35% अथवा सुमारे 11.1 कोटी शेअर्स राखून ठेवण्यात आले आहेत. एलआयसी सर्वसामान्य गुंतवणुकदारांसोबतच आयपीओचा काही भाग त्यांच्या विमाधारकांसाठी सुद्धा राखून ठेवणार आहे. परंतु विमाधारकांसाठी नेमकी किती संख्या राखून ठेवण्यात येणार आहे याचा खुलासा माहितीपत्रकात करण्यात आलेला नाही. सर्वसामान्य गुंतवणुकदार आणि विमाधारकांना आयपीओसाठी किती व कशी सवलत देण्यात येईल याचा उल्लेख माहितीपत्रकात देण्यात आलेली नाही.

दरम्यान, यावर्षी अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी एलआयसी आयपीओ साठीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगितले होते. त्यानुसार, या 31 मार्चपूर्वी जगातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक असलेली एलआयसी बाजारात सुचीबद्ध होईल.

देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या मेगा आयपीओचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने कोटक महिंद्रा कॅपिटल, गोल्डमन सॅच (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह 10 मर्चंट बँकर्सची म्हणजे व्यापरी बॅंकांची नियुक्ती केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button