breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

औरंगाबादच्या संपर्क प्रमुखपदी ‘या’ नेत्याची निवड, राष्ट्रवादीकडून नियुक्ती

औरंगाबाद महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्या दृष्टीने प्रत्येक पक्षाने हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही यासाठी जय्यत तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबाद पालिका निवडणुकीआधी जिल्ह्यात मोठा बदल केला असून, धनंजय मुंडे यांच्या जागी आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची औरंगाबादच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्याचे संपर्क प्रमुखपद याआधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे होती. मराठवाड्यातील निवडणूक प्रचाराचा प्रमुख चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे असायची, मात्र आता राष्ट्रवादीकडून मोठा बदल करण्यात आला आहे.

कोरोना काळातील कामगिरीमुळे राजेश टोपे यांची सर्वसामान्यांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण झाली असल्याने, त्यांच्या चांगल्या छबीचा फायदा व्हावा, यामुळे राजेश टोपेंची संपर्क प्रमुखपदी नियुक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते.

दुसरीकडे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांची इच्छा असल्याचंही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button