गेंड्यांच्या शिकारीला गेलेले स्वत:च बनले सिंहांची शिकार
जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) – गेंड्यांची बेकायदा शिकार करण्यासाठी गेलेल्या शिकाऱ्यांचीच सिंहानी शिकार केल्याची घटना दक्षिण आफ्रिकेतील एका अभयारण्यात घडली आहे. सिबुया गेम रिझर्व या अभयारण्यात सोमवारी ही घटना घडली. रायफल्स आणि कुऱ्हाडी घेऊन घेऊन तीन शिकारी गेंड्याची बेकायदा शिकार करण्यासाठी अभयारण्यात गेले होते. पण त्यांनी गेड्याची शिकार करण्यापूर्वी त्यांचीच शिकार सिंहांनी केली आणि त्यांचा पार फडशा पाडला.
गेंड्याच्या शोधात वाट चुकून हे शिकारी सिंहांच्या कळपाकडे गेल्याने त्यांना प्राण गमवावे लागले असे अभयारण्याचे नील फॉक्स यांनी सांगितले.
हे तीन शिकारी किती सिंहांच्या कळपाच्या तावडीत सापडले याची कल्पना नाही, पण तो मोठा कळप असला पाहिजे. त्यांच्या शरीरांचा फार थोडा भाग शिल्लक राहिला होता. तेथे तिघांचे कपडे सापडले. या भागात सिंहानी माणसांना मारून खाल्याचे मी यापूर्वी पाहिले नव्हते, असे त्यांची सांगितले. शिकारींमुळे आफ्रिकेतील जंगलांत केवळ 25000 गेंडे शिल्लक आहेत. चीन, व्हिएतनाम आणि अन्य एशियायी देशांमध्ये गेंड्यांच्या हाडांना मोठी मागणी आहे.