breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईत २ जूनपासून फिनटेक महोत्सव ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मुंबई : मुंबई येथे जागतिक ‘फिनटेक हब’ उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले असून याचाच एक भाग म्हणून येत्या दोन व तीन जून रोजी हॉटेल ट्रायडंट येथे दोन दिवसीय फिन टेक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

या परिषदेत फिनटेक क्षेत्रातील स्टार्ट अप, विद्यार्थी आणि माहिती व  तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या अभिनव कल्पना आणि उपाय, फिनटेक क्षेत्रातील बदलत्या संधी याची माहिती मिळणार आहे तसेच बँक, वित्तीय सेवा संस्था, तंत्रज्ञान कंपन्या, माध्यमे आणि गुंतवणूकदार यांच्यासह प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

राज्यात या फिनटेक क्षेत्रातील उद्योगाच्या वाढीसाठी पूरक वातावरण असल्याने उद्योजकांना फिनटेक पॉलिसीचा लाभ मिळणार आहे .महोत्सवाची सुरुवात ‘फिनटेक ए पी आय सँडबॉक्स’ लाँच करुन होणार आहे. या महोत्सवात मुंबई फिनटेक हबचे सदस्य होण्यासाठी स्टार्टअप स्वतः नोंदणी करू शकणार आहेत. फिनटेक धोरण सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या अंतर्गत कर लाभ, आर्थिक प्रोत्साहन आणि महाराष्ट्रातील फिनटेक स्टार्टअपसाठी होस्टिंग सुविधा आणि राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ‘स्मार्ट फिनटेक हब”साठी प्रोत्साहनपर चटई क्षेत्रासह इतर बाबींचा समावेश आहे.

या महोत्सवामध्ये अनेक विषयांवर चर्चा होणार असून त्यामध्ये वित्तीय सेवा उद्योगातील तज्ञ, तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्था आणि शासनाचा सहभाग असणार आहे. भारतातील बाजारपेठ या विषयांतर्गत भारतातील फिनटेक क्षेत्रातील संधी आणि आव्हाने, जागतिक बाजारपेठ एक दृष्टीक्षेप, या क्षेत्राशी संबधित आर्थिक बाबींचा उहापोह, ‘स्केलिंग अप रेगटेक’-नव्या तंत्रज्ञाना मुळे निर्माण झालेले बदल आणि आव्हाने, या विषयांवर चर्चा होणार आहे. देशातील बँकिंग, वित्तीय आणि विमा क्षेत्रामधील सर्वोच्च कंपन्यांतील मान्यवर आणि नेते या चर्चेत सहभागी होणार आहेत. सिंगापूर, हाँगकाँग आणि युनायटेड किंगडम यांच्या आर्थिक प्राधिकरणाचे परराष्ट्र प्रतिनिधी देखील उपस्थित असतील. जागतिक स्तरावरील या उद्योगाची स्थिती यावर ते मार्गदर्शन करतील

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button