breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

गॅस सिलिंडर दरवाढ त्वरित मागे घ्या: ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची मागणी

मुंबई |महाईन्यूज | प्रतिनिधी

आधीच बेरोजगारी, दारिद्रय व दरवाढीने त्रस्त असलेल्या जनतेचा छळ करण्यासाठी गॅस सिलेंडरची 144.5 रुपयांनी काल दरवाढ केली आहे. मोदी सरकारच्या या घोर जनविरोधी धोरणाचा तीव्र निषेध राज्याचे ऊर्जा मंत्री, डॉ. नितीन राऊत यांनी केला असून त्वरित दर वाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.
नुकतेच दिल्ली येथे पार पडलेल्या निवडणुकीत भाजपला घोर पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजप बदल्याच्या भावनेतून ही दरवाढ लादून जनतेला त्रस्त करण्याचे धोरण राबवित असल्याचे डॉ. नितीन राऊत म्हणाले.
भाजपला जर कोणी विरोध केला तर त्याला कसे छळले जाते त्याची असंख्य उदाहरणे देता येईल. त्यांनी शाळेत शिकणाऱ्या बालकांना सुध्दा सोडलेले नाही. भाजप बदलेच्या भावनेने प्रेरित झालेली असून विरोधकांनाही देशोधडीला लावण्याचे प्रयत्न करत आहे. भाजपमुक्त देश झाल्याशिवाय या देशात लोकशाही टिकणार नाही. तमाम देशातील जनतेने भाजपचा विरोध करावा, असे आवाहन डॉ राऊत यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button