breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भविष्याचा वेध घेण्याऐवजी भाजपच्या सदस्यांना लागले भूतकाळाचे ‘वेड’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेला येत्या 4 मार्च रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. पन्नास वर्षात घडलेला महापालिकेचा इतिहास पुस्तकरुपी मांडण्यासाठी अंशुल प्रकाशन संस्थेला काम देण्यात येणार आहे. त्यासाठी 10 लाख रुपये खर्च येणार असून त्याला मान्यता घेण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची निर्मिती करण्यासाठी महापालिकेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. पन्नास वर्षातील महापालिकेची वाटचाल, शहराची जडणघडण, आजपर्यंतच्या विकासाचे टप्पे, विकास प्रकल्प, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा क्षेत्रातील कामगिरी पाहणे पालिकेला गरजेचे वाटू लागले आहे. 50 वर्षातील राजकीय वाटचाल, खेडेगाव ते स्मार्ट सिटी या संपूर्ण ऐतिसिक प्रवासाच्या भूतकाळावर कटाक्ष टाकण्याची नितांत आवश्यकता पालिकेच्या सदस्यांना वाटू लागली आहे.

ऐतिहासिक घडामोडींचा दस्ताऐवज पालिकेकडे उपलब्ध असताना त्याचे 800 पानाचे पुस्तक तयार करण्याची संकल्पना भाजपच्या नगरसेवकांना सुचली आहे. त्यासाठी अंशूल प्रकाशन संस्थेकडे हे काम देण्याचा ठराव तयार करण्यात आला आहे. अंशूल प्रकाश संस्थेला 10 वर्षाचा अनुभव असल्याचे म्हटले आहे. परंतु, दहा वर्षाचा अनुभव असलेली संस्था पालिकेचा पन्नास वर्षाचा इतिहास शब्दबध्द करू शकेल, याची शास्वती खूप कमी आहे. तथापि, या कामासाठी 10 लाख रुपयांचा खर्च येणार असल्याने त्याला मंजुरी देण्यासाठी स्थायीकडे शिफारस करण्यात आली आहे.

दैनंदिनी रद्द करणा-या सदस्यांना सुचले शहानपण

भाजपची सत्ता येताच पालिकेचा अवांतर खर्च वाचवून नागरिकांच्या पैशांची विल्हेवाट थांबविण्याचे शहानपण काही पदाधिका-यांना सूचले होते. त्यांनी तत्काळ पालिकेच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका आणि दैनंदिनी न छापण्याचा निर्णय घेतला. त्याचा खर्च वाचवून मोठे शुभकार्य केल्याचा डिंडोरा पिटवण्यात आला. मात्र, ठेकेदारांकडे वाढीव दराच्या निविदा, थेट पध्दतीने विषयांना मंजुरी देण्यात टक्केवारी उकळण्याचे काही थांबलेले नाही. हा प्रकार म्हणजे मोरीला बोळा आणि दरवाजा सताड उघडला असाच आहे. दैनंदिनी आणि कार्यक्रम पत्रिका न छापता होणारा खर्च वाचविणा-या भाजपच्याच सदस्यांना आता पालिकेचा इतिहास शब्दबध्द करण्याचा प्रस्ताव तयार केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button