breaking-newsआंतरराष्टीय

हाफीझ सईदच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

लाहोर : पाकिस्तानच्या गुजराँवाला येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीझ सईद याच्या न्यायालयीन कोठडीत बुधवारी आणखी १४ दिवसांची वाढ केली.

अमेरिकेने १ कोटी डॉलरचे इनाम जाहीर केलेला आणि संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी घोषित केलेला सईद हा त्याच्याविरुद्धच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांमध्ये जामीन मिळवण्यासाठी १७ ऑगस्टला लाहोरहून गुजराँवाला येथे जात असताना त्याला अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी त्याला दहशतवादविरोधी न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ७ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते.

बुधवारी सईद याला गुजराँवालातील याच न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आणखी १४ दिवसांनी वाढवली, असे वृत्त जिओ टीव्हीने दिले. सईदविरुद्ध संपूर्ण आरोपपत्र ७ ऑगस्टपर्यंत दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाला (सीटीडी) दिले. पंजाब प्रांतातील निरनिराळ्या शहरांमध्ये दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपाखाली सीटीडीने सईदसह जमात-उद-दावाच्या १३ उच्चपदस्थ नेत्यांविरुद्ध ३ जुलैला २३ एफआयआर नोंदवले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button