breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

गुंतवणूकदारांनी लावला विक्रीचा सपाटा, शेअर निर्देशाकांत मोठी घसरण

देशात कोरोनाचा फटका शेअर बाजारावरही बसत आहे. मुंबई शेअर बाजारात आज सकाळपासून गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. यामुळे शेअर निर्देशाकांत मोठी घसरण झाली.

सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३८५ अंकांच्या घसरणीसह ३०७७४ अंकावर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११० अंकांच्या घसरणीसह ८९९४ अंकावर आहे. तत्पूर्वी सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला होता.

आजच्या सत्रात सर्वच क्षेत्रात विक्री दिसून आली. ज्यात आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, बजाज फायनान्स, रिलायन्स, ऍक्सिस बँक, मारुती, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर या शेअरमध्ये घसरण झाली. व्होडाफोन, टाटा मोटर्स, भारत हेवी इलेक्ट्रिकल, अशोक लेलँड, भारती एअरटेल हे शेअर तेजीत आहे.

जगभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. आतापर्यंत एक लाखांहून अधिक नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थाही ठप्प झाली आहे. यातून प्रचंड नुकसान होणार असून बेरोजगारी आणि गरिबी मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती विविध जागतिक संघटनांनी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button