breaking-newsराष्ट्रिय

गांधीजींची संघ शाखेला भेट, सरसंघचालकांकडून उजाळा

नवी दिल्ली : महात्मा गांधीजींनी १९४७ मध्ये दिल्लीतील संघाच्या शाखेला भेट दिली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जातिभेद नाही, स्वयंसेवक अत्यंत शिस्तबद्ध आहेत, या दोन्ही गोष्टींचे गांधीजींनी कौतुक केले होते.. स्वयंसेवक दररोज सकाळी म्हटल्या जाणाऱ्या एकात्मता स्तोत्रात महात्मा गांधींचे नामोच्चारण करतात, त्यांचे स्मरण करतात, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त संघाच्या संकेतस्थळावर बुधवारी भागवत यांचा लेख प्रकाशित करण्यात आला.

१९४७च्या फाळणीच्या रक्तरंजित दिवसांमध्ये गांधीजींच्या दिल्लीतील निवासानजीक संघाची शाखा भरत असे. त्या शाखेवर गांधीजी आले होते. या भेटीचे वृत्त २७ सप्टेंबर १९४७ च्या ‘हरिजन’ साप्ताहिकात प्रसिद्ध झाले होते. शिस्तप्रिय, जातिभेदरहित स्वयंसेवकांना पाहून गांधीजींनी समाधान व्यक्त केले होते, असे भागवत यांनी लेखात म्हटले आहे.

१९३६ मध्ये वध्र्यातील संघाच्या शिबिरातही गांधीजी आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संघाचे संस्थापक डॉ. हेगडेवार यांनी गांधीजींची निवासस्थानी भेट घेतली होती. त्या भेटीत दोघांमध्ये झालेली चर्चा आणि प्रश्नोत्तरे आता प्रकाशित झालेली असल्याने सार्वजनिकही आहेत, असे भागवत यांनी लेखात नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button