breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड

पुणे : अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी ही घोषणा केली आहे. २ ते ४ फेब्रुवारी २०२४ रोजी महामंडळाचे ९७ वे भारतीय मराठी साहित्य संमेलन अमेरनेर येथे पार पडणार आहे.

महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली अखील भारतीय मराठी साहित्य महमंडळाची बैठक रविवारी पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात पार पडली. त्यामध्ये राज्यातून आलेल्या नावांवर चर्चा करण्यात आली. या नावांमध्ये जेष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे आणि जेष्ठ समीक्षक बाळकृष्ण कवठेकर यांचा समावेश होता.

हेही वाचा – Monsoon Update : मान्सुनने संपुर्ण महाराष्ट्र व्यापला, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बंद करून साहित्य महामंडळ आता संमेलनाध्यक्षाची सन्मानाने निवड करते. त्यानूसार यंदा शोभणे यांची निवड केली आहे. कवी प्रवीण दवणे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा असताना डॉ. रवींद्र शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. शोभणे हे कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button