breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना संसर्गाचे तुकाराम बिजेला संकट; देहू संस्थानकडून विशेष स्वच्छता मोहीम

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा बुधवारी (दि. ११) आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे. भाविकांसाठी आरोग्य, निवारा आणि पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय संस्थानने केली आहे. तसेच, सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्य देऊळवाडा आणि संत तुकाराम महाराज वैकुंठगमन परिसरात दर दोन तासांनी स्वच्छता आणि सफाईचे काम संस्थानने हाती घेतले आहे.

संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळ्याला ३७२ वर्षे होत आहेत. राज्याच्या कोनाकोपऱ्यातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या भाविकांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे.

याबाबत संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे म्हणाले, ‘‘भाविकांच्या सुरक्षेसाठी देऊळवाड्यात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. वैकुंठगमन सोहळ्याचा ज्या ठिकाणी मुख्य कार्यक्रम असतो, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. दिंडी प्रमुखांना संस्थानने पत्रव्यवहार केला आहे. दोन दिवसांत दिंड्या देहूत दाखल होतील. नव्याने दर्शनबारीची दुरुस्ती करण्यात आलेली असून, पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे.

संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आलेले असून, आतापर्यंत संस्थानने मंदिरासाठी दीड कोटी रुपये खर्च केले आहेत. मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. शुद्ध पाण्यासाठी फिल्टर बसविण्यात आलेले आहेत. तसेच सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मंदिरात आणि देऊळवाड्यात खास सोय करण्यात आलेली आहे. दर दोन तासांनी मंदिरात स्वच्छता करण्यात येत आहे. मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.

स्वच्छतेसाठी सोळा कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच, देऊळवाड्यात औषधे आणि उपचार मिळावा यासाठी बाह्यरुग्णविभाग सोय करण्यात येणार आहे. स्वच्छता आणि साफसफाईसाठी प्रबोधन करण्यात येणार आहे. इंद्रायणी नदीचा घाट स्वच्छ करण्यात येत असून, नव्याने बांधण्यात आलेल्या भक्तनिवासात वारकऱ्यांची सोय करण्यात आलेली आहे. या वेळी विश्‍वस्त माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, अजित मोरे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button