breaking-newsराष्ट्रिय

विमानात प्रवाशांसमोर प्रेमाचं जाहीर प्रदर्शन करणारे वैमानिक आणि एअर होस्टेस निलंबित

विमानामध्ये प्रेमाचं जाहीर प्रदर्शन करणाऱ्या वैमानिकाला आणि एअर होस्टेसला स्पाईस जेट कंपनी नोकरीवरुन काढून टाकले आहे. मागील महिन्यामध्ये घडलेल्या या घटनेसंदर्भात एका प्रवाशाने कंपनीकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर चौकशी अंती वैमानिक आणि एअर होस्टेसला दोषी ठरवण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-कोलकाता विमानामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. आपली ड्युटी संपल्यानंतर पुढील सीटीवर बसून वैमानिक आणि एअर होस्टेस एकत्र बसून आपल्या प्रेमाचं जाहीर प्रदर्शन (‘पीडीए’ किंवा ‘पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन’) करत होते. यासंदर्भात एका प्रवाशाने कंपनीकडे या दोघांची तक्रार केली. दोषी ठरलेला वैमानिक हा अतिरिक्त कर्मचारी म्हणून विमानातून प्रवास करत होता तर एअर होस्टेस ही ऑन ड्युटी होती.

तक्रारदार म्हणतो

तक्रार करणाऱ्या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार ऑफ ड्युटी असणारा वैमानिक आणि ही एअर होस्टेस बाजूबाजूच्या सीटवर खेटून बसले होते. सतत त्या दोघांचे काहीतरी चाळे सुरु होते. या गोष्टीचा त्रास होऊ लागल्यानंतर त्याने यासंबंधीत तक्रार केली. नंतर त्याने थेट कंपनीकडे या दोघांबद्दल तक्रार केली. या तक्रारीनंतर दोघांची चौकशी करण्यात आल्यानंतर ते दोषी असल्याचे अढळले. या दोघांनाही कामावरुन काढून टाकण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button