breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

निकृष्ट कामामुळे मेट्रो व्यवस्थापनाचे पितळ उघडे

नागपूर कनेक्शनने भविष्यात पिंपरी चिंचवडकर प्रवाशांच्या जिविताशी खेळ
मेट्रोच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करा, राष्ट्रवादी कॅाग्रेसची मागणी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पुणे व पिंपरी चिंचवड शहरात गाजावाजा करीत महामेट्रो प्रकल्पाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. जलदगतीने केलेल्या कामामुळे मेट्रोच्या पिलरचे काम निकृष्ट दर्जाचे होवू लागले आहे. मेट्रो प्रकल्पाचे अनेक सिमेंट पिलरचे ढलपे आत्ताच गळून पडू लागले आहेत. तसेच मेट्रोने उभा केलेल्या पिलरच्या सळई दिसून येवू लागल्या आहेत. त्यामुळे भविष्यात प्रवाशांच्या जिविताशी खेळ करण्याचा प्रकार मेट्रोकडून सुरु असून मेट्रोच्या सध्यस्थितीतील कामांचे स्ट्रक्चरल ऑडीट करा, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

याबाबत महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र देवून ही मागणी केली आहे. कासारवाडीतील सामाजिक कार्यकर्ते निलेश निकम यांनी ही बाब विरोधी पक्षनेत्यांच्या निर्देशनास आणून दिली आहे. याबाबत साने यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये मेट्रोचे काम जोरदार आणि प्रगतीपथावर सुरु आहे. पिंपरीपासून दापोडीपर्यंत सेवा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे खोदून मेट्राचे चालू आहे.

या कामामध्ये कासारवाडी येथील मेट्रोचा पोल क्रमांक २५१ कॉलम भरलेला आहे. हा कॉलम अतिशय धोकादायक पध्दतीने व अर्धवट स्थितीत कॉक्रीटीकरण केल्याचे दिसत आहे. त्यामुळे भविष्यात पिंपरी चिंचवड करांच्या जिवाशी संबंधीत ठेकेदार खेळू लागला आहे. सदरील बाब सामाजिक कार्यकर्ता निलेश प्रकाश निकम यांच्या निदर्शनास आली आहे. जर सामान्य नागरीकांच्या हे लक्षात येत असेल. तर भाजपचे पदाधिकारी, मेट्रो प्रशासनास हे दिसत नाही का? भाजपचे पदाधिकारी फक्त मेट्रोच्या कामातील सिमेंटचे ठेका, स्टिलचा ठेका, कामगाराचा ठेका मलाच कसा मिळेल, एवढेच हे बघत आहेत.पण कामाच्या गुणवत्तेकडे आणि दर्जाकडे त्याचे कोणाचेही लक्ष दिसत नाही.

महामेट्रोकडून पिंपरी चिंचवड शहरात युध्दपातळीवर सुरु झालेल्या कामाचे नमुना दिसून आला आहे. या प्रकारामुळे मेट्रोचे काम निकृष्ट दर्जाचे होवून उद्या काही दुर्दैवी घटना घडून जिवित आणि वित्तहानी झाल्यास त्याला भाजपचे पदाधिकारी व प्रशासन जबाबदार राहिल, असा इशारा साने दिला आहे.  दरम्यान, शहरातील आतापर्यत झालेल्या मेट्रोच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट मान्यताप्रात्त सरकारी संस्थेकडून करुन घेण्यात यावे. यामध्ये ठेकेदार जर दोषी आढळला तर त्वरीत त्याचे काम थाबंवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामार्फत तीव्र आदोलंन करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button