breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

एक्शन आणि ड्रामामध्ये खिळवून ठेवायला ‘मिर्झापूर २’ प्रदर्शित होणार ‘या’ तारखेला

मुंबई | अॅमेझॉन प्राईमवरील मिर्झापूर या वेबसीरिजला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर या सीरिजचा आता दुसरा भाग २३ ऑक्टोबरला प्र्दर्शित होणार आहे. याचे निर्मिती आणि निर्माते एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट असून ही अमेझॉनची ओरिजिनल सिरीज आहे. या सिझनमध्ये १० पट जास्त ऍक्शन पॅक भरलेले असून या वेळेस प्रेक्षकांना सत्ता, सूड आणि शक्तीचा एक अनोखा चेहरा बघायला मिळणार आहे.

या सिरीजमध्ये मिर्झापूरवासियांचे नवीन आणि आणखी खिळवणारे रूप प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. नवीन पटकथा प्रेक्षकांना बंदुकीच्या, ड्रग्सच्या आणि एकंदरीतच काळ्या आणि बदनाम दुनियेच्या आणखी जवळ घेऊन जाणारी आहे ज्यात प्रेक्षकांना रोमान्स आणि ड्रामा सुद्धा अनुभवायला मिळेल.

मिर्झापूर २ च्या या नव्या कोऱ्या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फाझल, दिव्येंदु, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिक दुगल, हर्षित शेखर गौर, अमित सैल, अंजुम शर्मा, शिबा चड्ढा, राजेश तेलंग, मनू ऋषी चड्ढा दिसून येतील तर या काही नवीन चेहरे विजय वर्मा, प्रियांशु पेंयुली आणि इशा तलवार सुद्धा झळकतील. या नवीन चेहऱ्यांसोबत प्रेक्षकांना सीरिजच्या पटकथेमध्ये काही रंजक गोष्टी बघायला मिळतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button