breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Hasan Mushrif : 16 हजार 700 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम प्रगतीपथावर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना सुरु राहावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 10 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यात सध्या 16 हजार 700 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असून 10 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण झाले आहेत. 15 व्या वित्त आयोगांतर्गत पंचायत समित्यांना आर्थिक अधिकार देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. यावेळी प्रश्नोत्तराच्या तासात विविध मागण्यांना उत्तर देताना ग्रामविकास मंत्री मुश्रीफ बोलत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button