breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

खळबळजनक! दिल्लीत ISIS चा अतिरेकी पकडला, दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आयसीसच्या एका अतिरेक्याला अटक केलेली आहे. त्याच्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडलेला आहे. हा शस्त्रसाठा दिल्ली पोलिसांनी जप्त केलेला आहे. दिल्लीतील धौला कुआं आणि करोल बागदरम्यान पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे.

दिल्ली पोलीस आणि अतिरेक्यांमध्ये फायरिंग झाली. यादरम्यान एका अतिरेक्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. अतिरेक्यांना पकडण्यासाठी दिल्लीतील विविध ठिकाणी छापा टाकला जात आहे. दरम्यान, ज्या भागात पोलीस आणि अतिरेकी यांच्यात चकमक झाली त्याठिकाणी बॉम्बशोधक पथक दाखल झालेलं आहे.

दिल्लीचे पोलीस उपायुक्त प्रमोद सिंह कुशवाहा यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे. “आयसीसचा एक अतिरेकी आयईडी स्फोटकासह पकडला गेलेला आहे. धौला कुआं येथे विशेष पथक आणि अतिरेक्यामध्ये फायरिंग झाली होती. पकडल्या गेलेल्या अतिरेक्याचे नाव अब्दुल युसुफ आहे. त्याच्याजवळ एक पिस्तुलदेखील मिळाली आह”, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button