breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गट-तट विसरून ‘आण्णा’साठी पिंपरीत महाआघाडीची वज्रमुठ, विरोधकांनी घेतला धसका

  • आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते एकवटले
  • उमेदवार आण्णा बनसोडे यांच्या विजयाचा केला संकल्प

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि समविचारी पक्षाच्या महाआघाडीचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक एकवटले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आण्णा बनसोडे यांना मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्याचा विरोधकांनी चांगलाच धसका घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीला अवघे आठ दिवस बाकी राहिले आहेत. आण्णा बनसोडे यांचे कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. अंतर्गत मतभेद विसरून महाआघाडीत समाविष्ठ पक्षाच्या शहरातील पदाधिका-यांची एकजूट तयार करण्यात आण्णाला यश आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ताकदीला आता आघाडीतील इतर पक्षांचे देखील बळ मिळाले आहे. त्यामुळे आण्णांची ताकद चौपट झाली आहे. या ताकदीच्या जोरावर आण्णांच्या समर्थकांनी पिंपरी मतदार संघात प्रचाराचा धुरळा उडविला आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायीचे माजी सभापती डब्बू आसवानी, उषा वाघेरे, निकिता कदम, पूर्व पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेविका मीना नाणेकर, शांती सेन, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीरंग शिंदे, शामा शिंदे, प्रसाद शेट्टी तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते ऋषिकेश वाघेरे, संतोष वाघेरे, चिंधाजी गोलांडे, आनंदा उर्फ अण्णा कापसे, चंद्रकांत गव्हाणे, दत्तोबा नाणेकर, अमरजित यादव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते माजी आमदार बनसोडे यांच्या प्रचार करत आहेत.

आण्णांसाठी कॉंग्रेसने कसली कंबर

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी कालच काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. काँग्रेसचे कार्यकर्तेही प्रचारात उतरले आहेत. काल (शुक्रवारी) बनसोडे यांच्या प्रचारार्थ पिंपरीगावात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पत्रकांचे वाटप केले. अण्णा बनसोडे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी करण्यात आले.

“2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णा बनसोडे यांचा केवळ 2 हजार 235 मतांनी झालेला पराभव प्रत्येक कार्यकर्त्याच्या जिव्हारी लागला आहे. यावेळी बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून मागील पराभवाचा वचपा काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”.

संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेस

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button