breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

‘सारथीप्रमाणेच महाज्योतीलाही स्वायत्ता द्या’, ओबीसी नेत्यांची मागणी

नागपूर – मराठा समाजाच्या सारथी संस्थेला स्वायतत्ता बहार करण्यात आली, त्याचप्रमाणे ओबीसीच्या महाज्योती संस्थेलाही स्वयत्ता देण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे. ओबीसी समाजाच्या लोकसंख्येनुसार या संस्थेला निधी मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या मागणीचे समर्थन केले आहे.

ओबीसी नेत्यांचा असंतोष राज्य सरकारने लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे ओबीसी समजाच्या उन्नतीसाठी महाज्योती संस्थेला स्वायतत्ता देण्याची मागणी करण्यात येत आहे. शिवाय, या संस्थेला स्वायतत्ता देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. त्यामुळे आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती दिल्याने राज्यातील मराठा समाज संतापला आहे. अंतरिम स्थगिती मागे घ्यावी याकरता राज्यभर मराठा समजाच्या संस्थांची विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. छत्रपती संभाजीराजे यांनी मुद्द्यावरून महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरले होते. ‘सारथी’चे पंख छाटण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप त्यांनी केला होता.

या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच ‘सारथी’ संस्थेला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्यात आली होती. त्यामुळे ‘सारथी’ला संचालक मंडळाच्या मान्यतेने विविध उपक्रम व कल्याणकारी योजना राबविता येणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे संस्थेच्या कामकाजाला गती मिळणार आहे. कल्याणकारी योजनांबाबत निश्चित करण्यात आलेल्या आर्थिक निकष व प्रशासकीय पद्धत याचा विचार करुन संचालक मंडळ आपल्या स्तरावर उचित निर्णय घेऊ शकेल. त्यामुळे सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकांना संबंधित प्रशासकीय विभागाकडून पूर्वपरवानगी घेण्याची गरज भासणार नाही.

काही दिवसांपूर्वीच ‘सारथी’ची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अर्थ व नियोजन खात्याकडे देण्यात आली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्र्यांनी ‘सारथी’च्या अडचणी सोडविण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू करून, संस्थेसाठी निधीही उपलब्ध करून दिला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button