breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

खुशखबर! मेट्रोचा दुसरा टप्पा मे महिन्यात सुरू होणार

मुंबई – मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मेट्रोचा दुसरा टप्पा २०२१ च्या मे महिन्यापासून सुरू होणार आहे. एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए राजीव यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. 11 डिसेंबरला पहिली ट्रेन दाखल होणार आहे. तर एप्रील महिन्यापर्यंत पर्यंत 10 ट्रेन दाखल होतील.

मेट्रोचे तिकीट दर कॅबिनेट बैठकीमध्ये ठरल्या प्रमाणेच रहणार आहेत. ‘आरे’तील मेट्रो कारशेड पहाडी विभागात हलवणार का या संदर्भात विधिमंडळात काय चर्चा झाली या संदर्भात मी इथे बोलू शकत नाही असंही त्यांनी सांगितले. राजीव पुढे म्हणाले, मे 2021 पर्यंत मेट्रोचा दूसरा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. केविड संसर्गामुळे मेट्रोच्या कामाला उशीर होतोय. मनुष्यबळ उपलब्ध करताना अडचणी आल्या आहेत. मात्र सगळ्या अडचणींवर मात करून काम करण्यात येत आहे.

असे आहेत मार्ग

मे 2021ला मेट्रो मार्ग 2 ए – दहिसर पश्चिम ते डिएन नगर आणि मार्ग 7 दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व सुरू होईल.

11 डिसेंबरला पहिली ट्रेन दाखल होईल आणि मे 2021पर्यंत 10 ट्रेन येतील.

14 जानेवारी 2021 मकर सक्रांतीला मेट्रो ट्रायल सुरू होईल.

डिसेंबर 2020 पर्यंत हे दोन्ही मार्ग सुरू होणार होते, परंतु कोवीड संकटामुळं पाच महिने विलंब होत आहे.

मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर लोकल्सवरचा ताण कमी झाला होता. आता दुसरा टप्पा सुरू झाल्यावर हा ताण आणखी कमी होणार आहे. कोरोनामुळे लोकांना आता सुरक्षीत आणि वेगवान प्रवासाची गरज आहे. त्यामुळे हा टप्पा सोईचा होणार आहे.

मेट्रोच्या इतर टप्प्यांचंही काम प्रगतीपथावर असून कोरोना संकटामुळे त्याला ब्रेक लागला आहे. आता ते काम सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र कामगार हे त्यांच्या गावी परतल्याने अडचणी येत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button