breaking-newsमहाराष्ट्र

मधुकरराव चव्हाण, राणा पाटील, मनसेचे नवगिरे आणि अपक्ष महेंद्र धुरगुडे यांचे उमेदवारी अर्ज दाखल

तुळजापूर | महाईन्यूज | प्रतिनिधी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकरराव चव्हाण, भाजप-शिवसेना मित्र पक्ष युतीचे राणा जगजीत सिंह पाटील, मनसेचे प्रशांत नवगिरे आणि अपक्ष महेंद्र धुरगुडे या चार मातब्बर उमेदवारांनी तुळजापूर विधानसभा मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

बुधवारी दुपारी सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्वाचन अधिकारी चारुशिला देशमुख यांच्याकडे दाखल केले. काँग्रेसकडून आमदार मधुकरराव चव्हाण अर्ज दाखल करीत असताना त्यांच्या समवेत तालुका अध्यक्ष अमर मगर, शहराध्यक्ष भारत कदम, स्वीय  सहाय्यक बबनराव जाधव, आमदार चव्हाण यांचे नातू अभिजित चव्हाण यांची उपस्थिती होती.

भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, भाजपा नेते ॲड. अनिल काळे, माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील, शिक्षणतज्ञ सुधीर पाटील, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. क्रांती थिटे, तुळजापूरचे नगराध्यक्ष बापूसाहेब कने, भाजपा जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे, तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे शहराध्यक्ष सुहास साळुंखे यांच्यासह इतर नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशांत नवगिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी जिल्हाध्यक्ष अमर राजे परमेश्वर, तुळजापूर शहराध्यक्ष धर्मराज सावंत, सुरज कोठावळे आणि ज्ञानेश्वर गवळी यांची उपस्थिती होती. अपक्ष उमेदवार म्हणून जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी त्यांचे समर्थक त्यांच्यासोबत उपस्थित होते.

तुळजापूर विधानसभा मतदार संघामध्ये आमदार मधुकरराव चव्हाण आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे. वंचित आघाडीकडून अशोक जगदाळे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांनी आज अर्ज दाखल केलेला नाही. देवानंद रोचकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेऊन आपण आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी काम करणार असल्याचे जाहिर केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button