breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण

अमरावती | अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या घरातील आतापर्यंत 11 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांचा आणि सासू-सासऱ्यांचा समावेश आहे. नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे नवनीत राणांनंतर रवी राणा यांचादेखील रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच नवनीत कौर राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट 2 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर राणा दाम्पत्य, त्यांची मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली.आमदार रवी राणा यांच्या वडिलांसोबतच आई, मुलगा, मुलगी, बहिण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं. रवी राणा यांच्या आई-वडिलांवर नागपूरच्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिथे नवनीत राणा आणि रवी राणादेखील गेले होते. सासू-सासरे आणि मुलांच्या संपर्कात आल्यामुळे नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली. दरम्यान, रवी राणा यांचा कोरोना रिपोर्ट प्रतीक्षेत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button