breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था सलाईनवर! दोरीला ग्लुकोजच्या बाटल्या लटकवून उपचार सुरू

बुलढाणा | महाराष्ट्राती घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये रस्त्यावर दोरी बांधून त्याला ग्लूकोजची बॉटल लावून रूग्णांना सलाईन दिली जात आहे. डॉक्टर रस्त्यावर बसून रूग्णांवर उपचार करत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील हा व्हिडीओ आहे. यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था सलाईनवर आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खापरखेड सोमठाणा गावात विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल ५०० पेक्षा जास्त महिला सह पुरूषांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयात व्यवस्थाच नसल्यामुळे रस्त्यावर उपचार सुरु करण्यात आले. बाधीत लोकांवर रात्रीच उपचार करून १०० चे वर नागरिकांना घरी सोडण्यात आले होते. तर २०० चे वर लोकांवर उपचार सुरू करण्यात आले होते.

हेही वाचा      –      महायुतीत पडणार मिठाचा खडा? लोकसभेच्या ‘त्या’ फॉर्म्युलावर शिंदे गट आक्रमक 

घटना घडल्यावर बाधीत लोकांना रात्रीच बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता, येथील वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते. त्यामुळे पोलिस व महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केले. डॉक्टर नसल्याने ग्रामस्थामध्ये संताप पाहायला मिळाला. सोशल मीडियावर अनेक जण या व्हिडिओवर संताप व्यक्त करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button