breaking-newsTOP Newsपुणेमहाराष्ट्र

दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचे वृध्दापकाळाने निधन

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

दैनिक पुण्यनगरी, आपला वार्ताहर, मुंबई चौफेर, कर्नाटक मल्ला या वर्तमानपत्राचे संस्थापक मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांचे आज दुपारी एकच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. जुन्नर तालुक्यातील उंब्रज येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे तीन मुले आणि पत्नी असा परिवार आहे.

दोन महिन्यांपूर्वी मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले. त्यातून त्यांची प्रकृती सावरल्यानंतर उंब्रर येथील निवासस्थानी त्यांना हलविण्यात आले. कोरोनावर यशस्वीपणे मात केलेली असताना काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड होऊ लागली. त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांना घरामध्ये ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. आज दुपारी एकच्या सुमारास त्यांचे निधन झाले. आज सायंकाळी पाच वाजता उंब्रर येथे त्यांच्या पर्थीवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button