breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी अधिका-यांचे उपटले कान, केल्या महत्वाच्या सूचना

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टरांचे रुग्णसेवा हे पहिले कर्तव्य आहे. शहराबाहेरुन येणा-या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा शेडची व्यवस्था करण्यात यावी. रुग्णालय फ्रेंडली होण्याच्या दृष्टीने ‘रुग्णालय माहिती टेबल’ सुरू करावे. त्याद्वारे रुग्णाला आयुषमान भारत, महात्मा फुले आरोग्य या शासकीय योजनांची माहिती देण्यात यावी, अशा सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वायसीएमच्या डॉक्टर अधिका-यांना केल्या.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज मंगळवारी (दि. 25) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. अधिका-यांची बैठक बोलाऊन त्यांनी वायसीएममधील व्यवस्थापनाच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक शाम लांडे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नागरिकांच्या तक्रारी, समस्यांबाबत अधिका-यांशी चर्चा केली आहे. प्रशासन, डॉक्टरांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच, महत्वाच्या बाबी सुधारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दोन महिन्यानंतर पुन्हा याचा आढावा घेणार आहे. वायसीएम रुग्णालयाच्या पलिकडे जाऊन महापालिकेच्या आरोग्य सेवेतही लक्ष घालणार आहे. भोसरीतील प्रस्तावित 100 खाटांचे हॉस्पिटल तयार असून ते का सुरु होत नाही, त्याचा अहवाल मागविला आहे. आरोग्यसेवेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहर, जुन्नर, आंबेगाव, खेड भागातील रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येतात. त्यासाठी केअर सेंटर करावे. रुग्णालयाच्या एकूण कार्यक्षेत्राविषयी बारकाईने लक्ष घातले आहे, असेही त्यांनी सांगितले.

https://www.facebook.com/mahaenews.in/videos/1364799977055885/
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button