breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

ऑटो टॅक्सी चालक मालकांच्या प्रश्नांसाठी खासदार शरद पवार सरसावले

बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील ऑटो टॅक्सी संघटना शिष्टमंडळासोबत पुण्यात बैठक

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन

पुणे / प्रतिनिधी

देशभरातील 25 कोटी ऑटो टॅक्सी, ट्रक, टेम्पो, बस चालक मालकांच्या अनेक समस्या रखडलेल्या आहेत. त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांचे प्रश्न शासकीय पातळीवर सूचना देऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करू 14 मार्च रोजी दिल्ली येथे नितीन गडकरी यांच्यासोबत देशभरातील संघटनांचे बैठक आयोजित करू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिले.

रिक्षा मालक चालकांच्या विविध मुद्द्यांसाठी 6 मार्च रोजी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे ऑटो, रिक्षा, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या बैठकीत खासदार शरद पवार यांनी नितीन गडकरी यांच्यासोबत फोनवर चर्चा करून आश्वासन दिले.

पुणे मोदी बाग येथे ही बैठक पार पडली. या वेळी ऑटो रिक्षा, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, महाराष्ट्र रिक्षा फेडरेशनचे युवा अध्यक्ष शुभम तांदळे आदी शिष्टमंडळामध्ये उपस्थित होते.

यावेळी बाबा कांबळे यांनी रिक्षा चालक मालकांच्या समस्या मांडल्या. ते म्हणाले की ओला उबर रीपिडो टू व्हीलर, टॅक्सीमुळे देशभरातील ऑटो, टॅक्सी व्यवसायावर परिणाम होत आहे. देशभरातील परिवहन व्यवस्था मोडीस निघत आहे. यासह देशभरातील चालक-मालकांसाठी महामंडळ स्थापन करण्यात यावे. ड्रायव्हर डे घोषित करण्यात यावा. स्क्रॅप पॉलिसी रद्द करण्यात यावी, आदी मागण्या मांडण्यात आल्या. रॅपिडो विरोधामध्ये आम्ही हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायालयीन लढाई जिंकली आहे. आता या भांडवलदार कंपन्या सरकारच्या माध्यमातून पुन्हा व्यवसाय करण्यासाठी कायदेशीर मान्यता मिळावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. या भांडवलदार कंपन्यांमुळे रिक्षा चालकांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने व देशभरातील कुठल्याही राज्य सरकारने परवानगी देऊ, नये यासाठी आम्ही दिल्ली येथे हे आंदोलन करणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

यावेळी शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत फोनवरती चर्चा केली. 14 मार्च रोजी नितीन गडकरी यांच्यासोबत देशभरातील संघटना प्रतिनिधींचे शिष्टमंडळासोबत बैठक आयोजित केली आहे. देशभरातील प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. रॅपीडो कंपनीची बेकायदेशीर प्रवास वाहतूक सुरू राहिल्यास रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान होईल. या बाबत खासदार पवार यांनी चिंता व्यक्त केली. तसेच वेळ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही पवार यांनी दिल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

आदरणीय शरद पवार यांनी 20 मिनिटापेक्षा अधिक वेळा मला दिला. यामध्ये बऱ्याच प्रश्नावर चर्चा झाली. आठवणी त्याची प्रश्नपत्रिका या मिटींग बद्दल आम्हाला खूप आशा अपेक्षा निर्माण झाल्या असून हा प्रश्न देशभरात घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं आनंद तांबे म्हणाले.

बाबा कांबळे यांचे नेतृत्वाखालील देशव्यापी आंदोलनासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचा पाठिंबा असून आंबेडकरी चळवतील कार्यकर्ते देखील या आंदोलन सहभागी होतील, असे राहुल डोंबाळे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button