breaking-newsताज्या घडामोडीमुंबईलेख

दिवाळीच्या शुभेच्छा! आज ‘वसुबारस’, म्हणजेच गोवत्स द्वादशी!

मुंबई – भारतात दिवाळी हा सण खूपच प्रसिद्ध आहे. विविध राज्यांत आपापल्या पारंपरिक पद्धतीने आपल्या संस्कृतीला धरुन दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात ‘वसुबारस’ हा दिवाळीचा पहिला दिवस असतो. वसुबारसेपासूनच दिवाळीला खरी सुरुवात होते. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच वसुबारस साजरा केला जातो. याला काही भागात ‘गोवत्सद्वादशी’ असेदेखील म्हटले जाते.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्‍यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते.

वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्सद्वादशी असे म्हणतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळीची सुरुवात होते. या दिवशी तेला-तुपात तळलेले पदार्थ, गायीचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सौभाग्यवती स्त्रिया गायीच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गायीला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

यंदाची दिवाळी

वसुबारस : निज अश्विन कृष्ण द्वादशी – 1 नोव्हेंबर, 2021
धनत्रयोदशी : निज अश्विन कृष्ण त्रयोदशी – 2 नोव्हेंबर, 2021
नरक चतुर्दशी : लक्ष्मीपूजन : निज अश्विन अमावास्या – 4 नोव्हेंबर, 2021
बलिप्रतिपदा/पाडवा : कार्तिक शुद्ध प्रतिपदा – 5 नोव्हेंबर 2021
भाऊबीज : कार्तिक शुद्ध द्वितीया – 6 नोव्हेंबर 2021

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button