breaking-newsराष्ट्रिय

खासगी प्रवासी बस ५०० फूट दरीत कोसळली, २५ ठार

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात बंजार भागात खासगी प्रवासी बसला भीषण अपघात झाला आहे. बस ५०० फूट खोल दरीत कोसळून २५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत. पोलीस अधीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी ही माहिती दिली.

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Himachal Pradesh: 20 injured after a private bus fell into a deep gorge near Banjar area of Kullu district. Rescue operations underway. The bus carrying around 50 passengers was on its way from Banjar to Gadagushani area

60 people are talking about this

कुल्लूच्या बंजार जवळ हा अपघात झाला आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. या बसमध्ये ५० प्रवासी असल्याची माहिती आहे. ही बस बंजारहून गादागुशानी येथे चालली होती.

३५ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्यावेळी बस प्रवाशांनी खच्चून भरलेली होती. बसमध्ये मोठया प्रमाणावर महाविद्यालयीन मुले होती. जी अॅडमिशन घेऊन परतत असताना वाटेत हा भीषण अपघात झाला. प्रशासनासोबत ग्रामीणही बचावकार्यात मदत करत आहेत.

दुर्घटनाग्रस्त बसमधील बहुतांश प्रवासी हे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या सराज विधानसभा क्षेत्रामधील आहेत. आतापर्यंत १२ महिला, सहा तरुणी, सात लहान मुले, १० युवकांना बाहेर काढण्यात आले आहे. सर्व जखमींना बंजार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button