breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह बीएमसीच्या ‘या’ दोन अधिकाऱ्यांचे लता मंगेशकर यांनी मानले आभार

मुंबई: गानकोकिळा लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ट्विटरवरुन आभार व्यक्त केले आहेत. मंगेशकर कुटुंब राहत असलेली प्रभुकुंज सोसायटी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे सील केल्यानंतर योग्य काळजी घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही लतादीदींना आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद दिलेले आहे. लता मंगेशकर राहत असलेली प्रभुकुंज सोसायटी मुंबई महापालिकेने चार दिवसांपूर्वी सील केली. प्रभुकुंज सोसायटीत गेल्या आठवड्यात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत.

त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सोसायटी सील करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंसह बीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांचे लता मंगेशकर यांनी आभार मानले आहेत. “नमस्कार, आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांचे मनापासून आभार. तसेच सीलबंद इमारतींच्या देखभाल व प्रभावी व्यवस्थापनासाठी डी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी प्रमोद पाटील यांचा विशेष उल्लेख.” असे ट्वीट लता मंगेशकर यांनी केलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button