breaking-newsपुणेमहाराष्ट्र

खवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री

बेळगावमधील तरुण अटकेत

पुणे : दुर्मीळ खवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री करण्यासाठी कात्रज भागात आलेल्या बेळगावमधील एकाला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले खवले वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

या प्रकरणी विनायक सुरेश पाऊसकर (२७, रा. बेळगुदी, बेळगाव, कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस शिपाई अभिजित रत्नपारखी यांनी या संदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज भागात एक जण दुर्मीळ खवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची विक्री करण्यासाठी आल्याची माहिती पोलीस शिपाई रत्नपारखी यांना मिळाली होती. त्यानंतर कात्रज चौकात पोलिसांनी सापळा लावला होता. विनायक पाऊसकर तेथे आला. पोलिसांनी संशयावरून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात आली.

पिशवीत ठेवण्यात आलेल्या छोटय़ा पिशवीत खवले आढळून आले. पोलिसांनी खवले ठेवलेली पिशवी जप्त केली. त्याच्याकडे असलेल्या पिशवीत ४ किलो ५६० ग्रॅम खवले आढळून आले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांनी वनविभागाला दिली. वनविभागाचे आधिकारी गायकवाड यांनी खवले जप्त केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक विष्णू ताम्हाणे, सहायक निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, कुंदन शिंदे, कृष्णा बढे, राहुल तांबे, अभिजित रत्नपारखी यांनी ही कारवाई केली.

खवले दीड लाख रुपये किलो

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विनायक पाऊसकर याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत खवले मांजराच्या शरीरावरील खवल्यांची दीड लाख रुपये किलो दराने विक्री करण्यात येणार होती, अशी कबुली पाऊसकरने पोलिसांना दिली. खवले मांजर दुर्मीळ आहे. जप्त करण्यात आलेले खवले वनविभागाने पश्चिम बंगालमधील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. पाऊसकर कोणाला खवले विकण्यासाठी आला होता? या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button