breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खडसेंवर चद्रकांत पाटील म्हणतात, ‘रात गयी, बात गयी..!

पुणे |महाईन्यूज|

भाजपला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज बोलणं टाळलं. ‘रात गयी, बात गयी…’ एवढीच प्रतिक्रिया पाटील यांनी एकनाथ खडसेंबाबतच्या प्रश्नावर दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज पुण्यात अटल बस सेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना एकनाथ खडसे यांच्याबद्दल प्रश्न विचारला. मात्र, त्यांनी काहीही बोलणं टाळलं. खडसे हा विषय आता संपला आहे, असंच त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केलं.

एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेश सोहळ्याच्या भाषणात बोलताना खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये आपल्यावर झालेला अन्याय व कटकारस्थानाचा पाढा वाचला. माझी ताकद काय आहे हे जळगावात मेळावा घेऊन दाखवून देईन, असा इशाराही खडसे यांनी दिला होता. खडसेंच्या इशाऱ्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button