breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘कोविड-19’ ‘या’ तरुणावर होणार देशातील पहिल्या लसीची चाचणी

मुंबई – कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी देशात लस बनवली जात आहे. पुढील आठवड्यात या नव्या लसीची क्लिनिकल चाचणी होणार आहे. यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीला ही पहिली लस दिली जाणार आहे, त्या व्यक्तीची निवड देखील करण्यात आली आहे.

माणसांवर या लसीचा प्रयोग करण्यात येणार आहे, यात चिरंजीत धीबरचं नाव पुढे आलं आहे. चिरंजीत धीबर हे एक शिक्षक आहेत. पुढील आठवड्यात त्यांच्यावर क्लिनिकल ट्रायल होणार आहे, त्यासाठी त्यांना आयसीएमआरच्या भुवनेश्वर केंद्राला जावं लागेल.

चिरंजीत धीबर यांनी आपल्या फेसबूकवर या विषयी माहिती देताना म्हटलं आहे, संघाच्या प्रेरणेमुळे मी कोरोना व्हायरससाठी क्लिनिकल ट्रायलसाठी, माझं शरीर देशाला दान केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार चिरंजीत धीबर यांनी एप्रिल महिन्यातच क्लिनिकल ट्रायल करण्यासाठी अर्ज दिला होता.

जाणकारांच्या मते चिरजीत धीवर हे बंगालच्या दुर्गापूरमध्ये शिक्षक आहेत. आरएसएसच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या महासंघाच्या कार्यकारिणीत सदस्य आहेत. आपल्या देशाची औषध निर्मिती करणारी कंपनी भारत बायोटेक ने आयसीएमआरसोबत मिळून कोरोना व्हायरसची लस बनवली आहे. या लसीची माणसांवर चाचणी या महिन्यात होणार आहे, देशातील १२ केंद्रांवर या लसीची क्लिनिकल ट्रायल होणार आहे.

सरकारकडून १५ ऑगस्टपर्यंत ही लस लॉन्च करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण ही लस भारतात कधी लॉन्च केली जाईल, सर्वांसाठी कधी उपलब्ध होईल याला किती उशीर होईल किंवा लवकर येईल, यावर वेगवेगळी मतं आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button