breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोवाड्यानंतर जयघोष केल्यामुळे शिक्षकांची विद्यार्थ्याला मारहाण

बेळगाव – बाल दिनाच्या कार्यक्रमात पोवाड्यानंतर जयघोष केल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्याला मारहाण केली. ही घटना बेळगाव येथील एका शाळेत घडली आहे. याची माहिती युवा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी शुक्रवारी शाळेत जाऊन शिक्षक व मुख्याद्यापकाला धारेवर धरले.

कर्नाटक सरकार व कानडी संघटना विविध कारणांनी मराठी भाषिकांना त्रास देत असतानाच बालदिनाच्या कार्यक्रमावेळी अशी घटना घडल्याने मराठी भाषिकात संतापाची लाट उसळली आहे. श्रीकांत कदम, शुभम शेळके, अंकुश केसरकर, संतोष कृष्णाचे, सूरज कुडुचकर, वेंकटेश पाटील, आदींनी शाळेत जाऊन जाब विचारला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button