breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
नवरात्रोत्सव : करवीरनिवासिनीची तृतीयेला ‘पन्नगालयावरील म्हणजेच पन्हाळ्यावरील नागांना दर्शन’ रुपात पूजा
कोल्हापूर । प्रतिनिधी
तृतीयेला करवीरनिवासिनी पन्नगालयावरील म्हणजेच पन्हाळ्यावरील नागांना दर्शन देत विराजमान झालेली आहे.
पराशर मुनींच्या पन्हाळ्यावरील विष्णुरुपी पुत्रप्राप्तीसाठीच्या तपोसाधनेची झळ नागलोकांना होवू लागते. त्यासाठी ते पराशरांच्या तपात विघ्न आणतात. परंतु, शेवटी शापभयाने नागलोक पराशरांनाच शरण जातात व सुरक्षित राहण्यास योग्य जागेविषयी विचारतात. तेव्हा पराशर मुनी त्यांना करवीर क्षेत्री जावून श्री महालक्ष्मीचे दर्शन घेवून तिला विचारण्यास सांगातात. तेव्हा नागलोक महालक्ष्मीचे दर्शन घेवून तिची स्तुती करतात, अशी पुराणात कथा सांगितली आहे.
श्री करवीरनिवासिनी महालक्ष्मीची पन्हाळ्यावरील नागांना दर्शन पूजा श्री. पुजक मकरंद मुनिश्वर व माधव मुनिश्वर यांनी बांधली आहे.