breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे श्री करवीरनिवासिनी दर्शन

कोल्हापूर / महाईन्यूज

नवरात्रोत्सवामध्ये करवीरनिवासिनीचे करवीरमाहात्म्यातील निवडक स्तोत्रांमधून होणारे दर्शन ही संकल्पना आज राबविली आहे. सर्वच स्तोत्रांमधून श्रीकरवीरनिवासिनीचे व्यापक आणि आदिशक्ति स्वरूपच वारंवार प्रगट होताना दिसते. कधी ती शिवाचे संहारकार्य करताना दिसते, तर कधी ब्रह्माचे निर्माणकार्यही करताना दिसते. तर, कधी विष्णुचे पालनकार्यही तीच करते.

ब्रह्मा- विष्णु- शिवाची ती जननीही आहे, आणि आत्मशक्तिही, अशा महाशक्तिची करवीरमाहात्म्यातील निवडक स्तोत्रे, मुळ संस्कृत संहिता आणि त्यांची मराठी आवृती या निमित्ताने जगदंबेच्या भक्तापर्यंत पोहोचणार आहेत. चतुर्थीला करवीरनिवासिनीची ‘ओम्काररूपिणी’ स्वरूपात पूजा करण्यात आली. चतुर्थीला करवीरनिवासिनी आपल्या व्यापक स्वरूपात विराजमान झाली आहे.

चतुर्थीला करवीरनिवासिनीचे सहस्रनामस्तोत्र भक्तांसाठी उद्धत होणार आहे. या सहस्रनामाची पार्श्वभुमी अशी की, मार्कंडेय ऋषी आणि नारद मुनी यांच्या संवादातून सनत्कुमारांनी सांगितलेल्या महालक्ष्मी सहसनामाचे विवेचन केले आहे. सनत्कुमार योगिजनांना महालक्ष्मीची हजार नावे सांगतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button