breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘केअरटेकर चोरटा’ सांगवी पोलिसांच्या जाळ्यात; 24 तोळे सोने घेतलं ताब्यात

पिंपरी |महाईन्यूज|

नवी सांगवी येथे केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या चोरट्याने घरातील २४ तोळे सोने व २० हजार रूपये रकमेवर डल्ला मारण्याची घटना सांगवी पोलिसांनी उघडकीस आणली. केअरटेकर चोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संगिता अजित कांकरिया (वय ५३ वर्षे, रा. राजयोग बंगला. क्रांतीचौक. किर्ती नगर. नवी सांगवी ) यांनी कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरातील २४ तोळे सोन्याचे दागिने व ४० हजार रुपये रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार सांगवी पोलिसात १७ ऑक्टोबरला तक्रार दिली होती.

गुन्हा दाखल होताच तपासाची चक्रे वेगाने फिरली. तपास अधिकारी व कर्मचारी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पाहणी केली असता घटनास्थळी कोणत्याही प्रकारची छेडछाड दिसून न आल्याने प्रथमता घरातील लोकांकडे व घरकाम करणाऱ्या महिलांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. यात काही हाती आले नाही. मात्र चौकशीदरम्यान फिर्यादी व फिर्यादी यांचा मुलगा यांनी सांगितले की, २० सप्टेंबर रोजी चोरीस गेलेले दागिने कपाटात ठेवण्यात आले होते परंतु, त्यानंतर तेे कधी पाहिले त्याबाबत निश्‍चित सांगता येत नाही. या दरम्यान २१ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर त्यांच्याकडे कामास असलेला एक केअर टेकर मुलगा काम सोडून गेला असल्याचे सांगितले.

पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावल्याने त्याचे मोबाईल फोनचे लोकेशन तपासले असता तो पिंपरी-चिंचवड शहरात असल्याचे लक्षात आले. त्याला त्याच्या फेसबुक अकाऊंटवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून संपर्क वाढवून भेटण्याची वेळ ठरवली. येथील कल्पतरू चौक येथे त्यास भेटण्यासाठी बोलावले. यात पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

संदीप भगवान हांडे( वय २५ वर्षे सध्या रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड. मुळगाव पिंपरखेडा,ता. गंगापूर जि. औरंगाबाद) असे नाव असून यास दाखल गुन्ह्यात अटक करून त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली. त्याच्याकडून सांगवी पोलिसांनी २४ तोळे सोन्याचे दागिने व १५ हजार रुपये रोख असा एकूण ६ लाख १५ हजार रुपये इतका मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी रंगनाथ उंडे, गुन्हे निरीक्षक अजय भोसले, यशवंत साळुंखे, चंद्रकांत भिसे, रोहिदास बो-हाडे शशिकांत देवकांत, आदी पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button