breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात कोविड सेंटरमध्ये फुटबॉल खेळणाऱ्या ६ कोरोना रुग्णांवर गुन्हे दाखल

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना आणि शहरातील रुग्णालयांत जागाच शिल्लक नसताना पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथील एकलव्य कोविड सेंटरमध्ये मास्क न घालता फुटबॉल खेळणाऱ्या उमेश चौगुले (३२), महादेव जयसिंग साळुंखे (२७), गुणाजी बबन पाटील (२१), संदीप नामदेव कळंत्रे (३६), वैभव पांडुरंग पाटील (२१) आणि विजय पाटील (३२) या ६ कोरोना रुग्णांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कोल्हापूरमधील कोविड सेंटरमधील कोरोनाचे रुग्ण फुटबॉल खेळत असल्याचा व्हिडीओ काल व्हायरल झाल्यानंतर एकलव्य कोविड सेंटरचे अधिकारी प्रवीण राव यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत हे माहित असतानाही या ६ तरुणांनी मास्क न घालता पोर्ले विरुद्ध कोतोली असा दोन संघात सामना खेळला होता. सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात २४६ नवे रुग्ण सापडल्याने कोल्हापुरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४ हजार ६२१ झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button