breaking-newsराष्ट्रिय
तामिळनाडूत कॉपर प्लांटला मद्रास हायकोर्टाची स्थगिती
मदुराई : तामिळनाडूच्या तुतिकोरिन या किनारी जिल्ह्यात वेदान्त उद्योग समूहातील स्टरलाइट कंपनीतर्फे उभारण्यात येत असलेल्या कॉपर प्लांटच्या बांधकामाला मद्रास उच्च न्यायालयानेगिती दिली आहे. या कॉपर प्लांटच्या विरोधात हजारो स्थानिकांनी निदर्शनं केली आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जवळपास 11 लोकांचा मृत्यू झाला असून, केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात तामिळनाडू सरकारकडून अहवाल मागवला आहे.
मुख्यमंत्री एडापडी पलानीस्वामी यांनी तेथील जनतेला शांततेचे आवाहन केले तर द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांनी पोलिसी अत्याचारांचा निषेध केला. तुतिकोरिनमध्ये आता 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.