breaking-newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ८३ हजार ७२३ वर

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या लवकरच ४ लाखांचा टप्पा ओलांडणार असे दिसत आहे. सोमवारी दिवसभरात राज्यात कोरोनाच्या ७ हजार ९२४ नव्या रुग्णांची भर पडली, यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ८३ हजार ७२३ वर पोहोचली आहे. यापैकी १ लाख ४७ हजार ५९२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून २ लाख २१ हजार ९४४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर १३ हजार ८८३ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सोमवारी १ हजार १२ नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख १० हजार १८२ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ६ हजार १३२ इतका झाला आहे. तर पुण्यात काल दिवसभरात कोरोनाच्या ३ हजार ४४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ३८ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७२ हजार ७८२ इतकी झाली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा १ हजार ७३७ वर पोहोचला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button