breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

नागपुरात ३ हजार सीसीटीव्ही; मुंढेंच्या केबिनमध्ये थेट कनेक्शन

नागपूर – नागपुरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाची चिंता वाढली. मात्र यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि नागरिकांकडून नियमांचे पालन करुन घेण्यासाठी नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतःच्या केबिनमध्ये वॉच रुम बनवली आहे. या वॉच रुममधून ते सुमारे ३ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नागपूरकरांवर नजर ठेवणार आहेत.

नागपूर शहरात सुरुवातीपासून तुकाराम मुंढे हे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. मात्र तरीही शहरात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागपूरकरांची चिंता वाढली आहे. यासाठी दोन दिवसांचा जनता कर्फ्यूही लावण्यात आला होता. मात्र जनता कर्फ्यूनंतरही रुग्ण संख्या कमी होत नाही.

नागपूरचे महापौर, आयुक्त नागरिकांना वारंवार नियम पाळा अन्यथा पुन्हा लॉकडाऊनचा सामना करावा लागेल, अशी विनंती करत आहेत. मात्र नागपूरकर काही केल्या ऐकत नाहीत. या पार्श्वभूमीवर शहरात काय सुरु आहे, कुठे नियमांचे उल्लंघन होत आहे. यावर बारीक नजर ठेवण्यासाठी आयुक्तांनी शहरातील सीसीटीव्हीचा आधार घेतला आहे. नागपुरातील जवळपास ३ हजार सीसीटीव्ही कॅमेरे शहरावर नजर ठेवून आहे.

याच सीसीटीव्हीचे थेट कनेक्शन तुकाराम मुंढे यांनी आपल्या केबिनमध्ये घेत वॉच रूम बनवली आहे. त्यामुळे मुंढे शहरात बारीक लक्ष ठेवून आहेत. तसेच महापालिकेची पथकेसुद्धा सतत रस्त्यावर असून त्याचा रिपोर्ट आयुक्तांकडे केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button