breaking-newsमनोरंजन

कोरोना विषाणूमुळे मराठी चित्रपटसृष्टीला बसणार तब्बल चारशे कोटी रुपयांचा फटका

मुंबई. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने मराठी चित्रपटसृष्टीची सर्व कामे बंद असून अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबले आहे. अनेक तयार चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. मात्र, चित्रपटगृहे पुन्हा पूर्वीप्रमाणे कधी सुरू होतील याची काहीही खात्री देता येत नाही. सप्टेंबरपर्यंत अशीच परिस्थिती राहणार असल्याने मराठी चित्रपटसृष्टीचे जवळजवळ ४०० कोटींचे नुकसान होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजे भोसले यांनी बोलताना दिली.


मेघराजे भोसले म्हणाले, लॉकडाऊनमुळे चित्रीकरणापासून प्रदर्शनापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे मराठी चित्रटसृष्टीचे नुकसान होत आहे. चित्रीकरण बंद असल्याने तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकारांना काम नाही, त्यामुळे त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे आवश्यक झाले आहे. मराठीतील कलाकार बॉलीवूड कलाकारांएवढे श्रीमंत नसल्याने आम्ही बॉलीवूडकडे मदत मागत आहोत. चित्रीकरण पुन्हा सुरू होईल तेव्हा कलाकारांच्या तारखांची आणि नंतर प्रदर्शनाची समस्या उद्भवणार आहेच. सरकारने चित्रपटसृष्टीतील लोकांना मदत करण्यासोबत राज्याचा जीएसटी रद्द करून मदत करावी, अशी अपेक्षाही मेघराजे भोसले यांनी व्यक्त केली.


वर्षाला साधारणतः १५० मराठी चित्रपट तयार होतात त्यापैकी जवळजवळ १०० चित्रपट प्रदर्शित होतात आणि यापैकी फक्त ८ ते १० चित्रपट सुपरहिट होतात. उर्वरित १०० पैकी ८० चित्रपटांचे निर्माते हे अन्य उद्योगधंद्यातील पैसा लावून चित्रपट निर्मिती करणारे असतात. कोरोनामुळे या निर्मात्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने हे निर्माते पुन्हा चित्रपटनिर्मिती करणार नाहीत. त्यामुळे मराठीची ८० टक्के चित्रपटनिर्मिती कमी होईल अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे खजिनदार वसंत ठुबे यांनी मराठी चित्रपटसृष्टीच्या कोरोना प्रभावाबाबत बोलताना दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button