breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पाण्यासाठी महिलांचा पुणे पालिकेच्या आवारात ‘हंडा गरबा’

पुणे महाईन्यूज

दसऱ्याचा सण तोंडावर असताना घरात पाण्याचा थेंबही नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याचा निषेध म्हणून बोपोडीतील महिलांनी सोमवारी महापालिकेवर हंडामोर्चा काढत पालिकेच्या आवारात मोकळ्या हंड्यानी दांडिया खेळला. पुण्यात सध्या मोकळ्या हंड्यांच्या गरब्याचे आंदोलन झाले. 

पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी हा हंडामोर्चा थांबवला. आचारसंहितेमुळे महापालिका प्रशासनाचे नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

बोपोडी प्रभाग क्रमांक आठमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. अनेकांच्या नळांना पाणी येत नाही. नळाला पाणी आले तरी अतिशय कमी दाबाने येते. सणासुदीच्या काळातही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाला ही बाब लक्षात आणून देण्यासाठी, तसेच हक्काचे पाणी लवकर मिळावे, या मागणीसाठी स्थानिक नगरसेविका सुनीता वाडेकर यांच्या नेतृत्वात जवळपास १०० महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा नेला. तिथे महात्मा फुले पुतळ्याजवळ घेर करत मोकळ्या हंड्यानी दांडिया खेळला. पालिकेच्या पायऱ्यांवर बसून प्रशासनाविरोधात घोषणा देत पाणी देण्याची मागणी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button