breaking-newsमुंबई

ठाणेकरांसाठी घोक्याची घंटा, 100 पेक्षा जास्त आहेत करोनाबाधित क्षेत्र तर..

ठाणे : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात ठाणे जिल्ह्यात धोक्याची घंटा आहे. कारण ठाणे जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या 500 च्या वर गेली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त करोना बाधित क्षेत्र म्हणजेच प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. अशात कोरोनाचा हा वाढता फैलाव रोखण्यासाठी ठाणेकरांनी घरात राहणं आणि सुरक्षित राहणं महत्त्वाचं आहे.

ठाणे जिल्ह्यात सर्वांत जास्त 161 करोनाबाधित ठाणे महानगरपालिका हद्दीत आढळले आहेत. ठाणे मनपा पाठोपाठ मिरा भाईंदर मनपा हद्दीत 114 करोनाबाधित आढळले आहे तर केडीएमसी 97, नवी मुंबई मनपा 85, बदलापूर 16, ठाणे ग्रामीण 16, भिवंडी मनपा 6, अंबरनाथ 4 आणि उल्हासनगर 1 अशी करोनाबाधित रुग्णांची आकडेवारी आहे.

आतापर्यंत 1 हजार 786 जणांच्या कोविड 19 चाचणी निगेटिव्ह आल्या असून या संसर्दजन्य रोगामुळे ठाणे जिल्हयात 17 जंणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसंच आनंदीची बाब म्हणजे आतापर्यंत एकूण 96 जण रुग्ण या जीवघेण्या आजारावर मात करून सुखरूप आहेत. पण या कोरोनाचा खात्मा करण्यासाठी सगळ्यांना सरकारच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button