टेक -तंत्रताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपाटी-पुस्तकमहाराष्ट्रराष्ट्रियसातारा

तालुकास्तरीय व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत हस्तलिखित प्रकारांत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववाडी चाफळचा प्रथम क्रमांक

अग्निपंख या प्रयोगशील सर्वोत्कृष्ट हस्तलिखितास प्रथम क्रमांक पंचायत समिती पाटणच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर केला निकाल

साताराः चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. आपल्या अवकाश संशोधनाची वाटचाल अपयशाचे टप्पे-टोणपे खात विजयाकडे गेली आहे! ‘चंद्रयान ३’च्या माध्यमातून भारताचे पाऊल चंद्रावर पडले. या अद्वितीय कामगिरीसाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. याच अभिनव संकल्पनेला व विज्ञानिष्ठ प्रयोगशिलतेला समोर ठेऊन आज विज्ञानाने केलेल्या कमालीच्या प्रगतीविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, हा हेतू समोर ठेऊन जाधववाडी शाळेच्या इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने प्रयोगशिल व प्रतिभावंत उपशिक्षिका कांचन सुतार मॅडम यांनी आपल्या हस्ताक्षराद्वारे अग्निपंख हे सुलेखन रेखाटले. स्व. यशवंतराव चव्हाण पाटण तालुकास्तरीय व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा 2023-24 अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वोत्कृष्ट हस्तलिखित या प्रकारांत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववाडी चाफळ, ता. पाटण जिल्हा सातारा या शाळेला प्रथम क्रमांक मिळाला.

जि. प. प्राथ शाळा जाधववाडीच्या मुख्याध्यापिका श्रीमती पोतदार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तर कदम सर यांचेही सहकार्य लाभले. शाळेच्या या प्रयोगशिल उपक्रमाचे पंचायत समिती पाटणच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या अखत्यारित परिक्षण होऊन जाधववाडी चाफळ या शाळेला हस्तलिखित या स्पर्धा प्रकारांत प्रथम क्रमांक मिळाला. अभिनव संकल्पनांद्वारे विविध प्रयोग सादर करण्यात जाधववाडी ही जिल्हा परिषद शाळा नेहमीच प्रयोगशील उपक्रम राबवित असते.

तालुकास्तरीय व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा 2023-24 विविध स्पर्धा प्रकार
स्व. यशवंतराव चव्हाण पाटण तालुका स्तरीय व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा 2023-24 अंतर्गत विविध स्पर्धा प्रकार घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने निबंध, वक्तृत्व, हस्ताक्षर, प्रश्न मंजुषा, पोवाडा, लोकनृत्य, बालनाट्य, गीतमंच, हस्तलिखित, आदी प्रकारांत ही स्पर्धा पार पडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button