breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

राणेंच्या वक्तव्याने शिवसेनेच्या रणरागिणी आक्रमक, पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी

  • कोणीही उठून काहीही बोलतो
  • राणेंच्या वक्तव्याने पेडणेकरांचा संताप
  • मुंबई पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी

मुंबई । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वात शिवसेना महिला आघाडी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात भेट घेणार आहेत. नारायण राणेंवर कारवाई करण्याची मागणी त्या करणार आहेत. कोणीही उठून काहीही बोलतो, शिवसेनेची महिला आघाडी पेटून उठलेली आहे आणि आम्ही पोलिसांना सांगू कारवाई करायला, असं पेडणेकर म्हणाल्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यावरुन शिवसेनेच्या रणरागिणी आक्रमक झाल्या आहेत. शिवसेना महिला आघाडी आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या नेतृत्वात आज दुपारी चार वाजता मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात ही भेट होणार आहे. शिंदे गटातील सेना आमदार सदा सरवणकर यांची भेट घेतल्यानंतर काल नारायण राणे यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याची शिवसेना महिला आघाडी तक्रार करणार असल्याची माहिती आहे. कोणीही उठून काहीही बोलतो, शिवसेनेची महिला आघाडी पेटून उठलेली आहे, असं पेडणेकर म्हणाल्या.

नारायण राणे काय म्हणाले होते?
सदा सरवणकर माझे मित्र आहेत, प्रभादेवीत जो प्रकार घडला, त्यानंतर त्यांची विचारपूस करण्याच्या हेतूने आलोय. फायरिंग झालेय असं म्हणता, तर आवाज आला का? असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला होता. मातोश्रीच्या दुकानात बसून तक्रारींचं मार्केटिंग करण्याशिवाय दुसरं काही काम उरलेलं नाही. पण असले हल्ले-बिल्ले करु नका, मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचंय फिरायचंय ना? परवानगी घ्यावी लागेल. ५० जण एकावर हल्ला करायला आले, त्यासाठी अजामीनपात्र कलम ३५४ लागतो, असं राणे सरवणकरांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.

दरम्यान, नारायण राणे यांच्या प्रक्षोभक वक्तव्यावरुन शिवसेनेची महिला ब्रिगेड चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेना महिला आघाडी आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे. किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. पेडणेकरांच्या नेतृत्वात आज दुपारी चार वाजता शिवसेना महिला आघाडी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात भेट देऊन राणेंवर कारवाईची मागणी करणार आहे. कोणीही उठून काहीही बोलतो, शिवसेनेची महिला आघाडी पेटून उठलेली आहे आणि आम्ही पोलिसांना सांगू कारवाई करायला, असं पेडणेकर म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button