breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोना विषाणूचा धोका टळता टळेना तोच केरळमध्ये बर्ड फ्लूची साथ…

केरळ |महाईन्यूज |

कोरोना विषाणूचा धोका टळला नसताना आता केरळमध्ये बर्ड फ्लूची साथ आल्याचे म्हटलं जात आहे. केरळमधील मलप्पुरममधील परप्पनगडी येथे बर्ड फ्लू आढळल्याने केरळ सरकार आणखी सतर्क झाले आहे. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी केरळ सरकारने आता कोंबड्यांचे कलिंग करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांपासून धोका असल्याचा किंवा नुकसान होण्याचा संभव असल्याचा संशय निर्माण झाल्यास अशा कोंबड्या किंवा पोल्ट्री फार्म हटवणे याला कलिंग असे म्हणतात.

केरळमध्ये बर्ड फ्लूची प्रकरणे समोर येत असून त्याच पार्श्वभुमिवर चिकन आणि अंड्यांची दुकानेही बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत…यावरील उपचारांसाठी एक किलोमीटरच्या परिसरात १० विशेष पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती आजार तपासणी अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले.

हे पथक सुमारे ४००० कोंबड्या हटवण्याचे काम करणार आहे. या बरोबरच ज्या ठिकाणी बर्ड फ्लू आढळला आहे अशा परिसराच्या १० किलोमीटरच्या परिघातील चिकन स्टॉल्स आणि अंड्यांच्या विक्रीवर बंदी आणण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जफर मलिक यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button