breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मंत्रीपद मिळालं नाही तर राणे मला संपवतील..’; भरत गोगावलेंनी सांगितला मंत्रिपदाचा किस्सा

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० आमदार आले होते. तर १० अपक्ष आमदार आले होते. अनेक जण एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्रीपदावर पाणी सोडून आले होते. यातील अनेकांना पुन्हा मंत्रीपद मिळाले. मात्र काहींना अजून मंत्रीपद मिळाले नाही. याचाच मजेदार किस्सा शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितला आहे.

भरत गोगावले म्हणाले, मुख्यमंत्री अडचणीत सापडलेले दिसले आम्हाला. आम्ही म्हटलं ठिक आहे. काय झालं विचारलं. एक बोलतो बायको आत्महत्या करेल. एक बोलतो मला नारायण राणे संपवेल. एक बोलतो राजीनामा देईल. साडेपाचला एकाला फोन केला. विचारलं काय रे? संभाजीनगरमध्ये तुम्हाला पाचपैकी दोघांना मंत्रीपदं दिली. आम्ही तीनपैकी एकही घेत नाही. आम्ही थांबतो. तुला एवढी घाई कशाला? त्याला समजावला.

हेही वाचा – ‘रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडं लावा’; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश

आता बायकोवाल्याचं काय करायचं? साहेबांना बोललो आता त्याच्या बायकोला आपल्याला जगवायला पाहिजे. मग त्याला मंत्रीपद दिलं. दुसऱ्याला नारायण राणे संपवायला नाही पाहिजे. आपला एक आमदार कमी होईल. बोललो त्यालाही देऊन टाका. मी थांबतो तुमच्यासाठी आणि मी थांबलो तो आजपर्यंत थांबलो, असंही भरत गोगावले म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button